ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सराटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न

271 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील सराटी येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोज बुधवारला वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कला व महोत्सव जि.प.उच्च प्राथमिक शाळा सराटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव मिळावा यासाठी जी. प.उच्च प्राथमिक शाळा सराटी नेहमी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असते.याच अनुषंगाने दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कला महोत्सवाला आपल्या मारेगावचे तहसीलदार श्री.उत्तमजी नीलावाड साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

तहसीलदार साहेब यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा बाबत मार्गदर्शन केले.तसेच सांस्कृतिक महोत्सवाचा नृत्याचा आनंद अनुभवला. या महोत्सवाला  प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मुकुंदजी माहूरे साहेब पुरवठा निरीक्षण अधिकारी तहसील मारेगाव,ग्रामपंचायत सराटी येथील सरपंच श्री.तुळशीराम कुमरे, उपसरपंच श्री.प्रशांत टेकाम,सदस्य श्री.विष्णूजी कांबळे, सदस्य श्री.गणपतजी आत्राम, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. विठ्ठलजी आत्राम ,

सदस्य श्री. मनोजजी ढेंगळे,सदस्य श्री.धर्माजी पोटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.हरिष दरबेशवार सर आणि इतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री.रामकृष्ण देवगडकर सर यांनी केले.प्रास्ताविक श्री.मनोज लांजेवार सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.उमेश दोडेवार सर यांनी केले.अतिशय प्रसन्न अश्या सायंकाळी शांत वातावरणात गावकऱ्यांनी मोठ्या गर्दीने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर