ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथील 32 वर्षीय युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



सुरेश पाचभाई मारेगांव

मारेगाव तालुक्यातील बोरी( गदाजी )येथील सुमारे 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्यामध्ये असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 रोज गुरुवारला सकाळी अंदाजे 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रीतम सुरेश सिडाम अंदाजे वय 32 वर्ष असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन प्रीतम हा रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळ पंचनामा करून प्रितम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालय पाठविण्यात आला.

त्याच्या आत्महत्यामुळे परिसरात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक प्रीतम यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा आप्तपरीवार आहे. प्रीतम याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जामदार दत्तू किनाके करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर