ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

तोतया पोलिसांकडून मारहाण व खंडणी

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथे स्वतःला एलसीबीचे पोलीस असल्याचे भासवून एका शेतकऱ्यास मारहाण करून त्याच्या वडिलांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अवघ्या एका तासात सिनेस्टाईल पाठलाग करून तीन तोतया पोलिसांना चारचाकी कारसह अटक केली आहे.

Impersonators posing as police officers beat and extorted money; Maregaon police take action in a cinematic style.

याप्रकरणी फिर्यादी मंगेश दिलीप मेश्राम (वय ३०, रा. लाखापुर, ता. मारेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वर्धा नदीवरून आंघोळ करून ते वनोजादेवी बसस्टॉपजवळील हॉटेलमध्ये चहा पिण्यास थांबले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या टाटा नेक्सॉन (क्र. MH32 AX 6254) मधून उतरलेल्या तीन इसमांनी स्वतःला एलसीबीचे पोलीस असल्याचे सांगत हुज्जत घातली व फिर्यादीस मारहाण केली.

भीतीपोटी फिर्यादी घरी पळून गेल्यानंतर संबंधित आरोपींनी त्याचा पाठलाग करून घर गाठले व वडिलांना धमकावत कारवाईची भीती दाखवून १५०० रुपये घेतले. नंतर हे आरोपी तोतया पोलीस असल्याचे निष्पन्न झाल्यावर फिर्यादीने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मारेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वणी–मारेगाव मार्गावर नाकाबंदी करून मार्डी चौकात चारचाकी कारसह आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये हर्षल रामेश्वर ठाकरे (वय ३८,  रा. आर्वी नाका ता. वर्धा  जि. वर्धा), हरीष कैलासराव ठाकरे (वय ३४,रा.रामनगर ता. वर्धा ) व अनंता अजाबराव धोटे (वय ३९, रा. तिरझडा ता.कळंब, जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 204, 318, 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके व पोलीस कॉन्स्टेबल सागर दीपेवार हे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही व्यक्ती पोलीस असल्याचा दावा करत संशयास्पद वर्तन करत असल्यास त्याची खातरजमा करूनच सहकार्य करावे आणि तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर