ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 2 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Rahul Gandhi | CM Fadnavis ✦ ⚡ Australia Cricket : 8 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीममध्ये फिरली भाकरी! ODI आणि T20 टीमची घोषणा, नव्या चेहऱ्यांना… ✦ ⚡ दुष्काळी बीडच्या शेतकऱ्याची कमाल, 3 एकरात लावलं पैशाचं पीक, योग्य नियोजन अन् वर्षात मालामाल, Video ✦ ⚡ दिवसा काम करून रात्र शाळेत शिकायचा, बारावीचा पेपर अवघड गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईचा आक्रोश, सांगलीत ह… ✦ ⚡ CNG Price Hike: LPG नंतर सीएनजीचा भडका! पेट्रोल आणि गॅसच्या दरात किती फरक? पाहा मुंबईतील आजपासूनचे नवे दर ✦ ⚡ IND vs NZ : 4,4,6,6,4,6,4,4… कॅप्टन केलं अन् फॉर्म गेला, पण Dhruv Jurel ने ‘सेंच्युरी’ ठोकून रोखली ऋषभ पं… ✦ ⚡ वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, 15 वर्षांच्या मुलाचं टोकाचं पाऊल, घरात गेला अन्…, सिंधुदुर्गात हळहळ ✦ ⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये
SP News Maregaon

Australia Cricket : 8 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीममध्ये फिरली भाकरी! ODI आणि T20 टीमची घोषणा, नव्या चेहऱ्यांना…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Australia Cricket Big Changes : क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी यंदाचं 2026 वर्ष चांगलं राहिलं नाही. ऑस्ट्रेलियाने लिंबू टिंबू टीमसोबत देखील मॅच गमावल्या तसेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप देखील जिंकता आला नाही. एवढंच काय तर बांग्लादेशसारख्या टीमकडून देखील ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर टेस्ट सिरीजमध्ये कांगारूंना आपला जलवा दाखवता आला नाही. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठे निर्णय घेतले असून भाकरी फिरवली आहे.
पॅट कमिन्सने संकेत दिले अन् भाकरी फिरली
साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. कांगारूंना 2-1 ने मालिका गमवावी लागली होती. हा पराभव ऑस्ट्रेलियाच्या जिव्हारी लागला होता. सिरीजनंतर पॅट कमिन्स याने संघात फेरबदल होतील, याचे संकेत दिले होते. अशातच आता ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघ जाहीर झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या लिमिटेड ओव्हर मालिकेसाठी संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
महली बियर्डमन आणि ऑलिव्हर पीक यांना संधी
महली बियर्डमन आणि ऑलिव्हर पीक यांचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात आठ नवीन खेळाडू मायदेशात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची शक्यता आहे. महली बियर्डमन, ऑलिव्हर पीक आणि जॅक एडवर्ड्स यांच्यासह लियाम स्कॉट याला देखील संधी देण्यात आली आहे. तर लॅकलॅन शॉ आणि सॅम हार्पर टी-ट्वेंटी मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करू शकतात.

IND vs NZ ODI : मॅच जिंकल्याचा आनंद क्षणभरही टिकला नाही! न्यूझीलंडला ‘जोर का झटका’, दोन स्टार खेळाडू वनडे सिरीजमधून ‘आऊट’

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ – मिचेल मार्श (C), झेवियर बार्टलेट, माहली बियर्डमन, ॲलेक्स कॅरी (WK), कूपर कॉनोली, जॅक एडवर्ड्स, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लीस, स्पेन्सर जॉन्सन, ओली पीक, मॅथ्यू रेनशॉ, लियाम स्कॉट, ॲडम झाम्पा.

ऑस्ट्रेलियाचा टी-ट्वेंटी संघ – मिचेल मार्श (C), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन, निखिल चौधरी, टिम डेव्हिड, जोएल डेव्हिस, जॅक एडवर्ड्स, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सॅम हार्पर, स्पेन्सर जॉन्सन, मिच ओवेन, लॅकलॅन शॉ आणि अॅडम झाम्पा.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर