ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 2 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Rahul Gandhi | CM Fadnavis ✦ ⚡ Australia Cricket : 8 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीममध्ये फिरली भाकरी! ODI आणि T20 टीमची घोषणा, नव्या चेहऱ्यांना… ✦ ⚡ दुष्काळी बीडच्या शेतकऱ्याची कमाल, 3 एकरात लावलं पैशाचं पीक, योग्य नियोजन अन् वर्षात मालामाल, Video ✦ ⚡ दिवसा काम करून रात्र शाळेत शिकायचा, बारावीचा पेपर अवघड गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईचा आक्रोश, सांगलीत ह… ✦ ⚡ CNG Price Hike: LPG नंतर सीएनजीचा भडका! पेट्रोल आणि गॅसच्या दरात किती फरक? पाहा मुंबईतील आजपासूनचे नवे दर ✦ ⚡ IND vs NZ : 4,4,6,6,4,6,4,4… कॅप्टन केलं अन् फॉर्म गेला, पण Dhruv Jurel ने ‘सेंच्युरी’ ठोकून रोखली ऋषभ पं… ✦ ⚡ वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, 15 वर्षांच्या मुलाचं टोकाचं पाऊल, घरात गेला अन्…, सिंधुदुर्गात हळहळ ✦ ⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये
SP News Maregaon

दिवसा काम करून रात्र शाळेत शिकायचा, बारावीचा पेपर अवघड गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईचा आक्रोश, सांगलीत ह…

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली: बारावीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून 18 वर्षीय युवकाने टोकाचं पाऊल उचललं. ऑक्टोबरचा पेपर झाल्यावर घरात कुणी नसताना गळफास घेत आयुष्य संपवलं. दत्तात्रय विठ्ठल नरळे (वय 18, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, साखरकारखाना) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून सांगलीत हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हा बारावीचं शिक्षण घेत होता. दिवसा काम करून रात्र शाळेत त्याचं शिक्षण सुरू होतं. ऑक्टोबरमध्ये त्याची परीक्षा सुरू होती. पेपर अवघड गेल्याने तो नैराश्यात होता. शुक्रवारी सायंकाळी घरात कुणी नसताना त्याने टोकाचा निर्णय घेतला. साडीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Pune News: पुणे : कपडे वाळत घालण्याच्या तारेनं घेतला महिलेचा जीव, शाळेतून येताच ते दृश्य पाहून लेक हादरला

दत्तात्रयची आई कामावरून परतली तेव्हा घराचा दरवाजा बंद दिसला. तिने शेजाऱ्यांना कळवले. खोलीचा बंद दरवाजा तोडून काढला. तेव्हा दत्तात्रयने गळफास घेतल्याचे आढळले. तेव्हा आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्याचा गळफास सोडवून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

दत्तात्रय हा नरळे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. पेपर अवघड गेल्याने मुलानं आत्महत्या केल्याचं समजताच आईला धक्का बसला. “पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करायची काय गरज होती? मी तुला आयुष्यभर सांभाळले असते” असे म्हणत आईने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांना पंचनामा केला. प्राथमिक तपासात दत्तात्रय हा पेपर अवघड गेल्याने नैराश्यात होता, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे आई-वडिलांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर