ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथील 20 वर्षीय युवकांची गडफास घेऊन आत्महत्या

212 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील बुरांडा (ख)बस स्टॉप जवळील पुलाखालील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील युवकाने राज्य महामार्गावरील बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाखाली कठड्याला नायलॉन दोराच्या साह्याने गडफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोज रविवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गोकुल राजु धुळे वय सुमारे 20 वर्ष रा.बुरांडा (ख ) ता .मारेगाव असे  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची युवकाचे नाव असुन तो काल रात्रीच्या सुमारास घरी कोणालाही न सांगता निघून गेला होता रात्री घरच्यांनी त्याचा शोधाशोध घेतला पण त्यांचा स्थाग पत्ता लागला नाही. सकाळच्या सुमारास काही शेतकरी शेताकडे जात असताना पुलावर नायलॉनचा दोर बांधून दिसल्याने सदर घटना उघडकीस आली.त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच पोलीस पाटील बुरांडा (ख) यांना दिली.

त्यांनी लगेच मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.बातमी लिहेपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.त्याच्या पश्चात बाबा,एक लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जामदार राजू टेकाम करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर