ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मारेगाव शहरात एकाच रात्री 14 ते 17 ठिकाणी जबरी घरफोडी, पोलिसांसोमोर मोठे आवाहन.

123 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– चोरट्यांनी केला अनेक घरी हात साफ.

-मारेगावकरांची आजची सकाळ उजाडली घरफोडीच्या सत्राने.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव येथे काल दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोज गुरुवारला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शहरात एकाच रात्री सुमारे 14 ते 17 ठिकाणी घर फोडल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अनेक जण पोळ्याच्या सनाचे निमित्याने मूळ गावी गेलेल्या नागरिकांच्या घरी ही घटना घडली आहे.या घटनेमुळे मारेगाव पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे.काल रात्री चोरट्यांनी चांगलाच मोठा डल्ला मारल्याची शक्यता आहे.

मारेगाव शहरातील माधव नगरी या एकाच कॉलोनीत सुमारे 10 जबरी घरफोड्या घडल्या असून इतर भागात 7 जबरी घरफोड्या घडल्याची महिती आहे.पोळ्याचा सणासाठी शहरातील काही नागरीक हे आप आपल्या गावाला ग्रामीण भागात गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

मारेगावकरांची आजची सकाळ उजाडली घरफोडीच्या सत्राने रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला.असुन आता पर्यंत 17 घरी चोरी झाल्याचे उघड झाले आहे.तर बाहेर गेलेले बरेच लोक गावाहून घरी परत न आल्याने तसेच ज्यांच्या घरी छोटी मोठी एक दोन हजारांची चोरी झाली त्यांनी तक्रार देण्यास इच्छुक नसल्याने नेमका आकडा अजुन पर्यंत समोर आलेला नाही.एकाच रात्री 14 ते 17 घरी घरफोड्या झाल्याने शहरात भिती व्यक्त केली जात असून सदर घरफोडीच्या घटना मारेगाव शहरातील माधव नगरी,ओम नगरी व निर्मिती नगर येथील आहे.

या घरफोडीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मारेगावातील माधव नगरी,ओम नगरी व निर्मिती नगरमध्ये घरफोडी केली.माधव नगरी येथे राजू डवरे,रमेश बोंडे,हेमराज कळंबे,संजय काकडे,सुंदरलाल आत्राम, देविदास भोयर,प्रभाकर जुमडे,संदीप राजगडे,सुनील भोयर,स्वाती आत्राम तर ओम नगरी येथे सुरज चिंचोलकर,कविश्वर चांदेकर यांच्यासह निर्मिती नगर येथील अविनाश लांबट व शेन्डे यांचा समावेश आहे.

सकाळी माधव नगरी व ओम नगरी येथील काही घरांचे कुलूप फोडलेल्या अवस्थेत शेजा-यांना आढळले. शेजा- यांनी तातडीने याची माहिती घरमालकांना दिली.काहींनी घरात प्रवेश करून बघितला असता आत सामान अस्ताव्यस्त होते.चोरट्यांनी कपाटाचे कुलूप फोडल्याचे ऐवज लंपास केल्याचे आढळले.घटनेची माहिती मिळताच घरमालक बाहेर गावाहून परत आले.काही घरमालकांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.तर काहींनी मुद्देमाल जास्त किमतीचा नसल्याने तक्रार देण्याचे टाळले.

सध्या या प्रकरणी अविनाश लांबट यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन अज्ञात चोरट्यावर कलम 457,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारेगाव पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता तात्काळ श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टचे पथक यवतमाळ इथून पाचारण करून त्यानुसार तपास सुरू केला असुन परिसराच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.



अज्ञात चोरट्यांची शोध मोहीम सुरू मारेगाव पोलिसांचे चौफेर पालथे…!

एकाच रात्री एवढ्या मोठ्या घरफोडीच्या घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली असुन मारेगाव पोलिसांकडून चोरट्यांचा शोध मोहीम सुरू आहे.शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणे सुरू आहे. ठाणेदार जनार्दन खंडेराव, पो.उ.नि.ज्ञानेश्वर सावंत,रजनिकांत पाटील,अजय वाभीटकर अवघे शहर पालथे घालत असून चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर