ब्रेकिंग न्यूज
Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video Sangli News: चुलत्याच्या गाडीखाली सापडली दोन वर्षाची चिमुकली, सांगलीत मन हेलावणारी घटना Ganpati Bappa: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? ‘ही’ कथा तुम्हाला माहितीये का? Video Bhau Gang : दोघजणं बाईकवरून आले अन् 15 राऊंड फायरिंग! जिम ट्रेनरचा जागीच मृत्यू, ‘भाऊ टोळी’च्या शार्प शूटरल… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी! पारंपरिक शेतीत केली कोबीची लागवड, शेतकऱ्याचं पालटलं नशीब, अडीच लाख निव्वळ नफा बाबापुरच्या गणरायाच्या चरणी लाखोंची गर्दी!
SP News Maregaon

Sangli News: चुलत्याच्या गाडीखाली सापडली दोन वर्षाची चिमुकली, सांगलीत मन हेलावणारी घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सांगली: घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा चुलत्याच्या मोटारीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सांगलीतील कर्नाळ रोडवर साईनाथनगर परिसरात ही थरारक घटना घडली. ओवी सागर साळुंखे असं अपघातात मृत्यू झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील सागर चंद्रकांत साळुंखे (वय 35) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास प्रशांत चंद्रकांत साळुंखे (वय 31, रा. संगमेश्वरनगर) हा गाडी (एमएच 11 बीएच 6170) पार्किंगसाठी घेऊन जात होता. तेव्हा साईनगर गल्ली क्रमांक 2 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने गाडी अचानक वेगाने मागे घेतली.

भरधाव कार चारदा पलटी, ‘ते’ दृश्य पाहून पोलिसांना संशय आला अन्…, छ. संभाजीनगरात भयंकर रॅकेटचा पर्दाफाश

दोन वर्षांची चिमुकली ओवी ही अचानक गाडीच्या मागील चाकाखाली सापडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-वडिलांचा क्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. याप्रकरणी चुलता प्रशांत साळुंखे याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलीस याप्रकरणात अधीक तपास करत आहेत. मात्र, चुलत्याच्या नजरचुकीने चिमुकलीला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर