ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीत प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण देऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येणार नाही, असे धोरण ठेवल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. यासाठी संघटनेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदने दिली. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम व पदोन्नतीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने आजपासून (दि. 16) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या या आहेत प्रलंबित मागण्या 1. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या 23 पदांचे पदोन्नती मिळावी
2. कार्यालय अधीक्षक पदांचे सेवाप्रवेशावर निर्णय घ्यावा.
3. सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता सदर पदांचे सेवानियम प्रवेश नसल्याने विभागातील विधी पदवीधारक सदर पदांवर नियुक्ती पासून वंचित आहेत.
4. वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करण्यात यावे.
5. पदनाम बदल लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक या पदांचे अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक पदनाम बदल करण्यात यावे.
6. आश्वासित प्रगती योजना वरिष्ठ लिपिक व कार्यालय अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अद्याप दिलेले नाहीत. याबाबत तत्कालीन परिवहन आयुक्त यांनी पंधरा दिवसात कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही. कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. यासाठी संघटनेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदने दिली. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम व पदोन्नतीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने मंगळवारी (दि. 16) पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर