ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

चांदवडला 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहरात सत्कार समारंभाचे आयोजन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व जिद्द बाळगून त्यास कठोर परिश्रमाची जोड देत सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर निश्चीत गाठता येते, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयातील सभागृहात आयोजीत तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर आयोजक चांदवड तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, खंडेराव आहेर, शहाजी भोकनळ, शिवाजी बस्ते, अ‍ॅड. पोपटराव पवार, रामकृष्ण तिडके आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी तालुक्यातील नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी, आत्मविश्वास वाढून त्यांचे करियर घडावे व त्यांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेतर्फे आयोजीत रोजगार मेळाव्यांतून आतापर्यंत ९ हजार विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झालेला असून वर्षभरात २५ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण १७० व नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्राचार्य दिलीप पवार यांनी केले. तर दत्तात्रय वाघचौरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकाश शेळके, साधना पाटील, संजय भांबर, अभिजीत ठाकरे, म्हसू गागरे, अरुण न्याहारकर, अभिजीत ठाकरे आदी उपस्थित होते. आर्यन नीलेश ठाकरे व महेश जाधव यांचा सत्कार तालुक्यातील आर्यन नीलेश ठाकरे याने आयआयटी ऑल इंडिया रँक १४७० मिळविल्याबद्दल तसेच महेश शांताराम जाधव याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर