ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

वेगाव येथील 44 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

177 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.वेगाव येथील एका 44 वर्षीय व्यक्तिने निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 23 जुलै 2024 रोज मंगळवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
रमेश सुर्यभान बोकडे वय सुमारे 44 वर्ष रा.वेगाव ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असुन त्याच्या कडे 3 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

रमेश हे आज सकाळी 7:30 वाजता घरी शेतात फवारणीसाठी जातो असे सांगून ते वेगाव ते बोर्डा मार्गावरील स्वतःच्या शेतात गेले.शेतात गेल्यानंतर त्यांनी मोठ्या भावच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक शेतकरी रमेश यांचे पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गर्शनाखाली जमदार अफजल पठाण करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर