ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मांगरूळ येथील घटना.

गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील मांगरूळ येथील सुमारे 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गावातीलच एका व्यक्तीच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

A young farmer committed suicide by jumping into a well.

सततच्या होणाऱ्या नापिकी आणि कर्जबाजारीपणात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याने वैतागून गावाजवळील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याचा माहिती आहे हि.घटना आज मांगरूळ येथे घडली असुन प्रफुल मोरेश्वर खडसे वय सुमारे 32 वर्ष असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन प्रफुल आणि त्याचे भाऊ यांची सामाईक शेती सुमारे 13 ते 14 एकर मांगरूळ येथे आहे.

हे सर्व भाऊ शेती करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.मागील वर्षीच प्रफुलचे लग्नसुद्धा आटोपले होते.सुखाने संसाराचा गाडा हाकत असतांना मागील काही वर्षांपासून सुरु असलेला दुष्काळ आणि यावर्षी नापिकीने मोडलेले शेतकऱ्यांचे कंबरडे त्यामुळे खडसे कुटुंबीय पुरत मेटाकुटीला आलेले होते.अशातच आज पहाटे सुमारे 5 वाजताच्या दरम्यान प्रफुल हा नेहमीप्रमाणे सोचासाठी गेला आणि परत आलाच नाही.

त्याने गावाजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहीरी मध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच घटना उगडकीस आली.मागील काही दिवसांमध्ये आत्महत्या ह्या काही प्रमाणात थांबलेल्या होत्या.परंतु आजच्या घटनेने पुन्हा आत्महत्येनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

मृतक प्रफुल्ल यांच्या पश्चात आई-वडील,पती, दोन भाऊ असा आप्तपरीवार आहे.प्रफुल याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जामदार भालचंद्र मांडवकर करत आहे.






ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर