ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अरे,वाटेला नाही फाटा !! म्हणुन चक्काजामच्या हेलपाटा !!

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अखेर हटवांजरी पोड वाशियांनी दिला चक्का जामचा ईशारा..


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की..

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर रस्त्यावर एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्तालाच्या कामात अळथळा निर्माण करत आहे.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे निवेदनातुन ग्रामस्थानी म्हटले आहे.

काल दिनांक 10 मार्च 2022 रोज गुरुवार ला तहसिलदार पुंडे यांचे कडे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले आहे.येत्या दिनांक 14 मार्च 2022 रोज सोमवार पर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला नाही तर 17 मार्च 2022 रोज गुरुवार ला दुपारी 12:00 वाजता वणी- यवतमाळ हाईवे रोड बुरांडा स्टॉप येथे चक्का जाम करण्यात येईल आणि याची सर्वंस्व जबाबदारी प्रशासनावर राहील.असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे..

हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता देश स्वतंत्र झाल्या पासुन इतक्या वर्षा नंतर सुमारे 1 महिण्या आधी या रस्त्याच्या कामला सुरूवात झाली होती पण हटवांजरी येथील एका शेतकऱ्यांनी पोडा कडे येणाऱ्या सरकारी स्तरावर अतिक्रमण करून रस्ता अडवला आहे या गावातील लोकांना येण्या-जाण्यासाठी दुसरा रस्ताच नाही अशी परिस्थिती असताना या वर्षी शासणा कडून निधी प्राप्त झाला असुन कामाला सुरुवात होउन अवघे काही दिवस झाले होते.

आणी रस्त्यावर जेसीपी च्या साह्याने मुरूम रस्त्यावर टाकायला सुरुवात झाली होती
हे काम सार्वजानिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांचे कडून करण्याचा येत असुन या कामा साठी 70 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन कामाला सुरुवात झाली होती पण पोडा पासुन काही अंतरापर्यंत काम पण झाले होते.एका शेतातून सुमारे 35ते 40 वर्षा पासुन या पोडा कडे जाण्यासाठी नकाशा प्रमाणे रस्ता आहे त्या रस्त्याने पोडातील नागरीक व शाळेत जाणारी मुल या मार्गाने ये-जा करत असते त्या रस्त्याशिवराय पोड वाशियाना दुसरा मार्ग नाही.

पण एका त्या शेकर्याच्या शेतातून वहिवाट व सरकारी रस्ता दोन्ही पण आहे व मी माझ्या शेताची मोजणी झाल्या शिवाय वही वाटेवरून व नकाशा प्रमाणे असलेल्या रस्त्याने पुढे काम करायचे नाही.म्हणून अडथळा निर्माण केल्या संदर्भात हटवांजरी (पोड) येथील लोकांनी तहसील कार्यालय मारेगाव यांना अनेकदा निवेदन देण्यात आले होते .पण त्यावर तहसील कार्यालया कडून कुटलीही दाखल घेण्यात आली नाही अशी माहिती ग्रामस्तान कडून प्राप्त झाली आहे.

काल दिनांक 10 मार्च 2022 रोज गुरुवार ला तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देवुन चक्का जामचा ईशारा देण्यात आला आहे.यावेळी राजू पारखी, परशराम ठक, लक्ष्मण आस्वले, संतोष टेकाम, सुरेश आत्राम, प्रमोद मेश्राम यांचे सह अनेक गावकरी गावकरी उपस्थित होते….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर