ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वणी च्या नाट्य कलावंतांनी “क्षण एक पुरे” या नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत पटकावले अभिनयाचे दोन बक्षिस..

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

महाराष्ट्रराज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 60 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत वणीच्या “क्षण एक पुरे” नाटकांनी पटकाविले 2 बक्षिस..


प्रतिनिधी: वणी


सविस्तर वृत्त असे की..
नुकतेच अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने चंद्रपूर इथे प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित क्षण एक पुरे नाटक सादर केले होते त्यावेळी चंद्रपूर करांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता.या स्पर्धेचा निकाल काल महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाने जाहीर केला. यात या नाटकातील जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के यांनी तसेच बालकलाकार कु.राधा सोनटक्के या दोन्ही कलावंतांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.



भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी ‘क्षण..एक पुरे’ ही मर्मस्पर्शी नाट्यकृती कलावंतांनी  सादर केली.या पुरस्काराने वणीतील नाट्य चळवळीत मानाचा तुरा रोवला गेला. उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र असल्याचे या नाटकाचे सर्वेसर्वा प्राचार्य हेमंत चौधरी यांना मला माहिती दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर