ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

खेकडवाई शेतशिवारात वाघाने पाडला एका गोऱ्याचा फडशा तर दुसरा गोरा जखमी.

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील खेकडवाई येथील शेतशिवारातील ही घटना आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.शेतकऱ्यांची कापुस वेचणी व शेतातीलकामाची जोमाने लगबग सुरू झाली आणि परिसरात वाघाचे आगमन झाल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या खेकडवाई परिसरातील शेतशिवारात कापुस वेचणी व तुरीवर फवारणीचे कामे जोमाने सुरू आहे त्यातच खेकडवाई येथील शेतकरी किसन चंद्रू आत्राम यांच्या मालकीहक्काचा गोरा हा खेकडवाई येथील त्यांचे जंगला जवळील स्वतःचा शेतात नेहमी प्रमाणे बांधलेला होता.शेतकरी व त्यांची पत्नी स्वताच्या शेतात कापुस वेचत असताना वाघाने हल्ला केला व गोऱ्याला बांधल्या ठिकाणी ठार केल्याचे निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.

अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने गोऱ्यावर हल्ला चढवून जागीच ठार केला तर सायंकाळी जनावरे घराकडे आणत असताना दादाजी गजानन रामपुरे यांचा गोरा जखमी केल्याची घटना दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली.शेतकरी पशुधन मालक किसन चंद्रू आत्राम व दादाजी गजानन रामपुरे यांच्या मालकीची गोरा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एका गोऱ्याचा वाघाने फडशा पडला तर दुसऱ्या गोऱ्याला जखमी केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात एक गोरा ठार तर दुसरा गोरा जखमी झाल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी.

शेतकरी व पशुपालक किसन चंद्रू आत्राम,दादाजी गजानन रामपुरे यांनी केली आहे. परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे त्या मुळे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

प्रतिक्रिया.
खेकडवाई शिवारात वाघ आहे. “जनजागृती” सर्व शेतकऱ्यांनी शेतातली कामे करतांना किंवा कापुस वेचणी करत असताना सावधगिरी बाळगावी शेतात सकाळी लवकर एकट्यानी जाण्याचे टाळावे शेतात जातांना बोलत किंवा आवाज करत जावे व सायंकाळी शेतातुन लवकर यावे असे आवाहन शंकर ग. हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर