ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तेलंगणातील औषधावार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास.

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

किटकनाशके खरेदीसाठी राज्यातील शेतकऱ्यांची बेला, आदिलाबाद कडे धाव.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.या पिकांवर मावा,तुडतुडे पांढरी,माशी,बोंड अळी या सारखे रोग येतात या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कडे अनेक प्रकारच्या किडनाशक,किटकनाशके आहे परंतु ती पाहीजेत त्या प्रमाणात परिणाम करत नसल्याची आपल्या कडील शेतकऱ्यांचे म्हणणे असून त्या तुलनेत तेलंगणात राज्यात विकणारी औषधे परिणामकारक असून कपाशी पिकांची वाढ चांगली होते.

तसेच फांद्याची चांगली वाढ होण्यासाठी मदत होते व फुले व फळे चांगली येत असल्याचे अनुभव शेतकरी सांगत आहेत.त्यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक शेतकरी तेलंगणातील बेला आदिबाद या ठिकाणी खरेदी साठी जात असून वणी , झरी , मारेगांव, केळापूर इ तालुक्यातील शेतकऱ्यांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळतात.तेथिल कृषी सेवा केंद्रात लाखोची उलाढाल होत आहे.बरेच शेतकरी सुरुवाती पासूनच तेथिल औषधांची फवारणी करत आहेत .

एक्सोडस ,बायोस्पार्क,टेक्सा इ .औषधी गेल्या काही वर्षांत मोठया प्रमाणात वापर केला जात आहे.दोन वर्षात महाराष्ट्र राज्यात १ जून च्या आत बियाणाची विक्रीसाठी बंदी घालण्यात आली मात्र त्यामुळे १ ताखेच्या आत अनेक शेतकऱ्यांनी तेलंगणात बियाणाची खरेदी केली.परिणामी राज्यातील बियाणाचा खप कमी झाला.यावरून आपल्या राज्यात उपलब्ध बियाणे व किटक नाशके यांच्या दर्जा विषयी संशय व्यक्त केला जात असून आपल्या राज्यातील शासकीय धोरण याला कारणीभूत असल्याचे बोलेले जात आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर