ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन शाळेचे इंग्रजी शिक्षक आशिष साबरे यांची राज्यस्तरीय इंग्रजी भाषेच्या परिसंवाद कार्यशाळेसाठी निवड.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

▪️जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,यवतमाळ ने केली निवड.

▪️न्यू ट्रेंड्स इन इंग्लिश टिचिंग, लर्निंग अँड इव्यालुशन या विषयावर करणार सादरीकरण.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी: तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नामांकित व दहावी बोर्डाच्या तसेच इतर स्पर्धात्मक परीक्षेत नेहमी अग्रेसर असणारी शाळा म्हणजे गुरुकुल कॉन्व्हेंट,शाळा अशी शाळेची परिसरात ख्याती आहे.याच शाळेच्या गौरवशाली प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुरुकुल शाळेचे इंग्रजी शिक्षक आशिष अशोक साबरे यांची राज्यस्तरीय इंग्रजी भाषेच्या परिसंवाद कार्यशाळेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,यवतमाळ ने ही निवड जाहीर केली आहे.आशिष साबरे सर चेस मॉडरेटर म्हणून गेल्या 5 वर्षापासून झरी तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे.इंग्रजी भाषा अधिक सुलभ करून विद्यार्थ्यांना ती ज्ञात कशी होईल तसेच विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेचा विकास आणि इंग्रजी भाषा संभाषण कौशल्य विकसित करणे यासाठी सरांनी तालुक्यातील माध्यमिक इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे.

येत्या 20 जानेवारी 2023 ला मंगळवेढा जि सोलापूर येथे न्यू ट्रेंड्स इन इंग्लिश टिचिंग, लर्निंग अँड इव्यालुशन या विषयावर आशिष सर सादरीकरण करणार आहे.सरांच्या निवडीमुळे शाळेच्या व्यवस्थापन समितीने तसेच मुख्याध्यापक सुभाष गजभिये सर यांनी आशिष साबरे यांचे अभिनंदन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर