ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

टी.डी.आर.एफ. वर्धापन दिनानिमित्त
विविध सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन

174 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी(मुकुटबन):-आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी  अधिकृत असलेल्या  TDRF ला दिनांक 9 मे रोजी 17 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी  सर्व TDRF जवान एकत्रित येऊन वर्धापन दिन साजरा करतात. त्यानिमित्त  TDRF द्वारा यावर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यातील व तालुक्यातील TDRF अधिकारी व जवान 1 मे ते 9 मे या कालावधीत TDRF वर्धापन दिन साप्ताह साजरा करत आहेत.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहात TDRF जवानांकडून TDRF संचालक संस्थापक हरीचद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
झरी जामणी  मुकुटबन येथे दि.७ मे २०२२ रोजी TDRF  जवानांकडून एकता दौड व रॅली चे आयोजन करण्यात आले होते. मुकुटबन चे  पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी या एकता दौड ला हिरवी झंडी दाखवून दौड ची सुरुवात केली.

दौड सोबतच TDRF जवानांकडून  सामाजिक विषयांवर रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जय भारत, जय भारत जय भारत देश हमारा है भारत, बेटी बचाव बेटी पढाव, मन मे है एक हि सपना स्वच्छ रहे भारत अपना , पाणी अडवा पाणी जिरवा, अशा अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणांनी रॅलीमधील सर्वांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये वणी व मारेगाव झरीजामणी तालुक्यातील सर्व TDRF जवानांचा सक्रिय सहभाग होता.मुकुटबन पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी TDRF जवानांच्या कार्याचे कौतुक करून  रॅली चा समारोप करण्यात आला.
     हा सर्व उपक्रम TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस, TDRF  मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. या उपक्रमांसाठी गौरव थेटे,शुभम चौधरी, मयुरी मलवडे,  भाग्यश्री मोहितकार ,गौरव पारशीवे, कैलास् पारशीवे गणेश बुरांडे नयन उरकुडे सानिया असुटकर काजल वाडके व इतर टीडीआरएफ अधिकारी व जवान सहभागी होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर