ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

डोंगरगांव (वडगांव रीट)शेतशिवारात वाघाने पाडला गोऱ्याचा फडशा.

70 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वडगांव रीट जंगला जवळील शेतशिवारातील घटना.

पशुधन पालकाची नुकसान भरपाईची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव:-तालुक्यातील डोंगरगांव (वडगांव रीट) येथील जंगला जवळील शेतशिवारातील ही घटना आज दिनांक 1 ऑक्टोंबर 2022 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा एकदा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या डोंगरगांव , वेगाव,परिसरातील शेतशिवारात कपाशीचे निंदण व खुरणीचे व फवारणीचे,कामे जोमाने सुरू आहे.

त्यातच डोंगरगांव येथील शेतकरी बाबाराव मारोती काकडे यांच्या मालकीचा गोरा हा डोंगरगांव जवळील वडगांव रीट हद्द मारेगाव तालुक्यातील जंगला जवळील पडीक शेतशिवारात गुराखी नेहमी प्रमाणे पशुधन घेवुन चराईसाठी गेला होता.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने गोऱ्यावर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना दिनांक 1ऑक्टोंबर 2022 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गुराखी जंगला जवळील शेतात जनावरे चारत असताना वाघाने हल्ला केला व गोऱ्याला ओढत नेत ठार केल्याचे निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.

गुराख्याने पशुधन मालकाला या घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली. बातमी लिहीपर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. शेतकरी पशुधन मालक बाबाराव मारोती काकडे यांच्या मालकीचा गोरा असल्याची सूत्रान कडून माहिती प्राप्त झाली आहे.गोऱ्याचा वाघाने पडशा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात गोरा ठार झाल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी.

शेतकरी व पशुपालक बाबाराव मारोती काकडे यांनी केली आहे. सुमारे 20 दिवसा आधी पण चोपणे यांची एका कालवडीचा वाघाने फडशा पाडला होता.त्या मुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे.वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर