ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

मुकुटबन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

276 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्त्रीरोग,हृदयरोग व मधुमेह,अस्थिरोग,बालरोग,जनरल फिजिशियन, नेत्ररोग,सर्जरी,दंतरोग,कान,नाक व घसा मोफत तपासणी

मोठ्या प्रमाणात रुग्णांनी लाभ घेण्याचे काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य तथा शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांचे आयोजन

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,डेस्क

गणेशोत्सव,गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी दु. 1 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी,रोग निदान, ईसीजी,रक्त तपासणी,बीएमडी तपासणी केली जाणार आहे.रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण केले जाणार आहे.खा.प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे शिबिर होत आहे.या शिबिराचा झरी तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य व शिबिराचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

सदर आरोग्य शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत.शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे झरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.शिबिराला तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

!!!!  मारेगाव व वणी येथेही शिबिर!!!!
शनिवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटल मारेगाव तर 15 सप्टेंबर रोजी वणी येथे महाआरोग्य शिबिर होणार आहे.मुकुटबन व मारेगाव येथील शिबिरात ज्या रुग्णांना गंभीर आजाराचे निदान होणार आहेत.त्या रुग्णांवर वणी येथे दि. 15 सप्टेंबर रोजी होणा-या सुपरस्पेशालिटी शिबिरात उपचार केले जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर