ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी तालुक्यातील आठ ग्राम पंचायतीचा निकालाचा प्रस्तापितांना धक्का.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

भाजप कडे दाभा,कारेगाव , हिवरा बारसा कॉग्रेसकडे – खरबडा, निमणी व मार्थाजून
शिवसेना -आडकोली,शिबला –  अपक्ष सरपंच

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील आठ ग्राम पंचायत ग्रामपंचायत निवडणूकची मतमोजणी आज शांततेत पार पडली.आगामी काळात होणाऱ्या जि.प. पंचायत समिती निवडणुकीसाठी ही निवडणूक प्रस्तापितासाठी अतिशय प्रतिष्ठेची असून त्या साठी  राजकिय पक्षांची आपाली ताकद लावल्याचे दिसून आले.

पहिल्यांदाच सरपंच पद हे गावातील सर्व मतदारातून निवडुन असल्याने या निवडणुकीला आगळे वेगळे महत्व होते.अनेक ग्रामपंचायतीत संपूर्ण पॅनल एका गटाचे आले.असले तरी सरपंच मात्र दुसऱ्या गटाचा निवडून आलेला असल्याने गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती अनेक गावात झालेली दिसली,त्यामुळे अर्धवट उत्साहाने कार्यकर्त्यांना परत जावे लागले,

अनेक स्वतःला दिगग्ज उमेदवार मानणाऱ्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने मत मोजणी केंद्राजवळून काढता पाय घेतला.हा निकाल धक्कादायक व अनेकांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारा होता कारण अनेक राजकीय लोकांचे गृहीतके खोटी ठरली व अनेकांचे राजकीय गणित बिघडविले.

एकंदरीत थेट जनतेतुन सरपंच निवडून आल्याने सत्ता स्थापणेतील घोडे बाजार,उमेदवारांना पळवून नेने ,असले बेकायदेशीर मार्गांना चाप बसला.या निवडणुकीत सरपंच माळ गळ्यात पडलेल्या उमेदवारांची नावे ग्राम पंचायत निहाय व एकूण झालेले मतदान  उमेदवारांना मिळालेली मत खालील प्रमाणे:-
ग्राम पंचायत दाभा – एकूण झालेले मतदान / ६१९ शकुंतला व्यंकटराव कुळसंगे विजयी झाल्या त्यांना ३१२ तर प्रतिस्पर्धी शोभा चांगदेव  कुळसंगे यांना ३०५ मत मिळाली .
खरबडा -८८१ /  गीता संतोष पुसाम ४५८  प्रथम क्रमांकाचे मत मिळवून सरपंच पद प्राप्त केले तर , शोभना अरविंद उरवते  यांना४१६ मत मिळाली.

माथार्जुन भागीरथा शंकर आत्राम ७९५ विजयी झाल्या , सीमा विलास किनाके ६३४ तर राधाबाई  बापुराव किनाके ११२ मत मिळली.
कारेगाव – – ८२४
सीताराम परशराम आडे ३६० मत प्राप्त करून  विजयी झाले, गोपाल नामदेव मडावी ३३१ , तरजगदिश गणपत मडावी १६० मत मिळाली आहे.

अडकोली -७९०  अशोक सीताराम पंधरे ३६७ प्राप्त करून विजयी झाले तर जयश्री नंदकिशोर उइके २२० ,प्रफुल मनोहर मरसकोले १५० , मारोती यादव कुडमेथे ३२, सचिन विठ्ठल विठ्ठल जुमनाके यांना केवळ १९ मत मिळवता आली आहे .
निमणी – ५३९
जिजाबाई निळकंठ किनाके २४४  प्राप्त करून विजयी झाल्या आहेत तर श्रद्धा अनिल पेंदोर १४९ आणि रुक्माई सुभाष कुडमेथे  १३४ अशी मते मिळाली.

हीवरा -बारसा १४४४
चंदा दिनेश आत्राम ६८३ प्रथम क्रमांकाचे मत विजय प्राप्त केला आहे. सपना सागर कुळमेथे ५३९ मत मिळाली आहे .
शिबला १३७८
रजनी दादाजी कोडापे  ४२९मते घेऊन सरपंच पद प्राप्त केले तर कल्पना हनुमान करपते  यांना ३९८ मत मिळाली आहे . ,निवडणूक निकालासाठी तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार महेश रामगुंडे,ए.सी.रामगुंडे .इतर कर्मचारी यांनी व्यवस्थापन केले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर