ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कमी पटसंख्या शाळा बंदच्या विरोधात धरणे आंदोलन.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिक्षक संघटना झरी यांचा सहभाग.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी: शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.याचा निषेध व्यक्त करीत झरी येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड शाखा झरी तथा समस्त शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला अभिवादान करून धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शासनाने गाव तिथे शाळा हे धोरण राबावीत असताना केवळ आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ही बाब विचारात घेऊन तसेच शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याऐवजी शून्य ते वीस बी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भात शासनाने जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शाळा बंद करण्यात येऊ नये याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी या शाळा बंद झाल्यास तेथील गोर गरीब जनतेच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होऊन ते कायमचे शिक्षण प्रवाहापासून दूर लोटले जातील. त्यामुळे या बाबीचा गांभिर्याने शासनाने विचार करावा, विद्यार्थीसंख्ये अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. असे मत विषद केले तर प्रमुख मार्गदर्शन अरविंद गनगुलवार सर व मंगेश खामणकर यांनी केले.

RTE अॅक्ट 2009 नुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काची तरतूद आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे. त्यानुसार वस्ती, वाडे, तांडे अशा दुर्गम भागात शाळा सुरु करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे.

कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात अधिक आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या संदर्भात पुढील भूमिका बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या आंदोलनाचे प्रस्थाविक काटकर सर यांनी केले. यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आशिष झाडे, प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल केमेकार उपस्थितीत होते , तालुक्यातील विलास मडावी, राहुल धोटे, ओम कुळसंगे, रमेश आत्राम, माधव भिडकर आदी शिक्षक व पालक उपस्थित आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर