ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

Beed: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलीला पळवलं, गावाकडून आली अन्… बीडमध्ये खळबळ

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून पुढे आला आहे. केज तालुक्यातील पोलीस अकादमी परिसरातून ही घटना घडली. मुलीचे वय 17 वर्षे 11 महिने असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

लातूर जिल्ह्याच्या एका गावातील मुलगी पोलीस भरतीची तयारी करत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ती बरड फाटा येथील सह्याद्री अकॅडमीत पोलीस भरतीचा सराव करते. नागपंचमीचा सण असल्याने ती गावी गेली होती. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता तिचे वडील दुचाकीवरून तिला घेऊन साळेगावपर्यंत आले. तिथून मुलगी रिक्षातून केजला आली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत अकॅडमीपर्यंत गेली.

Solapur: 42 वर्षांची महिला अन् 27 वर्षांचा तरुण, इन्स्टावर जुळलं, तिनं नवऱ्याला सोडलं अन्…, सोलापूरच्या प्रकरणाचा भयंकर शेवट

गेटवरूनच मुलीला पळवलं

मुलगी अकॅडमीच्या गेटवर असतानाच तिला फूस लावून पळवून नेल्याचं सांगितलं जातंय.  या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी आकाश कोंडिंबा रोंगे (रा. मुरुड अकोला, ता लातूर) याच्यावर संशय व्यक्त केला आहे. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांत आकाश रोंगे यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुलीबाबत…

मुलीचा रंग गोरा असून तिची उंची पाच फूट पाच इंच आहे. तिच्या अंगात पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस असून पायात पांढऱ्या रंगाचा बूट आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फोजदार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर