ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गोंड बुरांडा येथील घराला आग लागून साहित्य जळुन खाक.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शासनाने मदत करण्याची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथील एका घरी कोणी नसतांना घराला आग लागून घरातील उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील गोंड बुरांडा येथे घडली. आधीच निराधार असलेल्या राजूचे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने राजुवर मोठे संकट कोसळले असून शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी पीडिताने केलेली आहे.

गोंड बुरांडा येथील राजू महादेव आसूटकर असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. संकट यायला लागली की कशी एकामागून एक येत असतात असाच चांगला अनुभव राजुला आला. कोरोनाच्या महामारीत राजूने आई,वडील गमावले.राजू तो भूमिहीन आहे. कसाबसा मोलमजुरी करून तो जगत आहे.

अशातच दिवाळीच्या दिवशी दिनांक 26 ऑक्टोबर 2022 ला राजुने नेहमीप्रमाणे आपल्या घरी दिवे लावले. आणि तो बाजूलाच असलेल्या पानटपरीवर गेला. एवढ्याच वेळात लावलेल्या दिव्याची वात उंदीर अथवा इतर वस्तूने घरात नेली असावी आणि ही आग लागली असा संशय व्यक्त केल्या जात आहे.

या आगीमध्ये गृहउपयोगी साहित्य, अनाज, टीव्ही, टेबल, कागतपत्र,अंथरुणाचे साहित्य, सोबत मजुरीचे ठेवलेले 5 हजार रुपये हे सारे साहित्य जळून खाक झाले. मजुरीच्या भरोशावर आपली गुजरान करणाऱ्या एका गरीबाच्या घरातील सर्व साहित्य जळल्याने राजुवर आभाळ कोसळल्यागत संकट आले आहे.

आईवडिलांचे छत्र आधीच हरवलेल्या राजुला शासनाने मदत करावी असा सूर सगळीकडून उमटत असून राजुने यासंदर्भात मारेगाव तहसील येथे निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर