ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

बोटोणी ते सराटी रस्ता मोजतोय अखेरची घटका

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्त्यात एक-एक फुटाचे खड्डे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता.

विदर्भ एस.पी. न्यूज मारेगाव,

मारेगांव तालुक्यातील बोटोणी ते सराटी या 4 कि.मी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आले नाही.त्या मुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे.या रस्त्यावर जंगलातील सुमारे 1 कि.मी अंतराचे काम तीन वर्षा आधी करण्यात आले होते पण उर्वरीत 3 कि.मी. चा रस्ता उखडून खड्डे व गिट्टी चे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते सराटी हा 4 किमीचा रस्ता आहे. मागील काही वर्षांपासून या रस्त्याचे काम करण्यात आले नाही त्या मुळे हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे.घोन्सा तसेच खंडणी मेंढणी परिसरातील जनतेला बोटोनी अथवा करंजी जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे.आणि आता हाच रस्ता अखेरची घटका मोजत आहे. यावर्षी पडलेल्या अतिवृष्टी मुळे या 3 किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की वाहन दुरच राहीले साधे पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

हा रस्ता गेल्या अनेक वर्षां पासून तयार करण्यात आला नाही.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.या मार्गाने जाणाऱ्या चार चाकी वाहन चालकाला मोठी कसरत करत वाहन चालवावे लागत आहे.या मार्गावरील गावकरी नागरिकांना एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला तालुक्याच्या ठिकाणी नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.

हा रस्ता पूर्णपणे उखडून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे रस्त्यात तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बनले आहे. सदर रस्त्यामुळे परीसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता. हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी परीसरातील नागरिकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर