ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मान्सूनपूर्व पावसाने उडवली दाणादाण

204 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अनेकांची घरे पडली तर इलेक्ट्रिक पोल आणि झाडे सुद्धा उन्मळून पडली

सुरेश पाचभाई मारेगाव,

मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. अनेकांची दाणादाण उडाली.यात हिवरी,अर्जुनी आणि गोधनी या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेकांचे घरे उडाले शेतातील जनावरे बांधण्याचे गोठे उडाले तर रस्त्यावरील विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

मागील काही दिवसापासून तालुक्यामध्ये गारपीट,वादळ वारा आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे.दोन दिवसात सतत घर उडून नेणे विज पडून जनावरे दगावणे असे अनेक प्रसंग तालुक्यामध्ये घडत आहेत तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही अवकाळी पाऊस मात्र थांबायचं  नाव घेत नाही.

आज दिनांक सहा जूनला दुपारच्या सुमारास आकाशामध्ये अचानक ढग दाटून आले आणि वादळ वाऱ्यासहित गारपीट आणि पावसाला सुरुवात झाली.वारा एवढा सोसाट्याने वाहत होता की या वाऱ्याने रस्त्यावरील झाडे सुद्धा ऊन मळून पडली अनेक गावातील अनेकांची घरे उडून गेली तर रस्त्यावरील विजेचे खांबसुद्धा उन्मळून पडले.

यामध्ये मजूर असलेले बंडू टेकाम,चंदू आत्रम लक्ष्मण मेश्राम भास्कर आत्राम,संजय आस्वले, संतोष कोडापे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नागरिकांना या अकाली पडलेल्या पावसामुळे बेघर व्हावे लागले आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरावरील छप्परच उडून गेल्याने आता राहायचे कुठे आणि संसार कसा चालवायचा असा यक्षप्रश्न या नागरिकांना पडलेला आहे.

राजेंद्र देरकर यांचा जनावरे बांधण्याचा गोठा उडून गेला आहे. तर निर्मला आत्राम यांच्या अंगावर घरावरील टीनावर असलेला दगड पडल्याने त्यांनाही इजा झालेली आहे.तसेच विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडलेली असून याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर