डोंगरगाव शेतशिवरातून अज्ञात चोट्याने केली स्टार्टर व ॲटोस्वीच चोरी.

तालुका प्रतिनिधी – वणी

वणी तालुक्यातील डोंगरगाव येथील शंकर तुकाराम डुबे वय सुमारे 42 वर्षे रा.डोंगरगाव ता. वणी जि. यवतमाळ
यांचे शेतातील बोअरवेलचे स्टार्टर व ॲटोस्वीच अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यात भिती निर्माण झाली आहे. आधीच शेकरी अती वृष्टी, पुर बुडाई आणि दुबार – तिबार पेरणी करून मेटीकुटीस आला व हवा दिल झाले आहे.

त्या मध्ये हे अज्ञात भामटे चोर शेतकऱ्याला अडचणीत टाकत आहे यांना आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.अशी परिसरातील शेतकऱ्याची व नागरिकांची मागणी आहे.शंकर  डुबे हे डोंगरगाव येथे राहतो व शेतीचे काम करतो व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यांनी या वर्षी गावातीलच त्यांचे काका सखाराम सिताराम डुबे याची शेत सर्वे नंबर 32 / 1 ही मक्त्याने केली आहे.त्या शेतामध्ये मोटारपंप बसवलेला आहे.

दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास ते नेहमी प्रमाने त्यांनी मक्त्याने केलेल्या  डोंगरगाव येथील शेतशिवारातील शेतीमध्ये काम करण्याकरिता गेले व शेताला पाणी देण्याकरिता बोरअरवेल चालु करण्यास पेटी जवळ गेले असता त्यांना बोरअरवेलचा केबल हा शेतातील स्टार्टर पेटीमधील पेटीमधुन बाहेर काढलेला दिसला.

त्यांनी पेटी उघडून बघली असता त्यांना त्यातील स्टार्टर अंदाजे किंमत 3000 /- रुपये व अँटोस्वीच अंदाजे कि. 750 रुपये असे एकुण 3750 रू चे साहित्य तिथे दिसले नाही.कोण्यातरी अज्ञात चोरट्याने ते दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी चोरून नेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी काल दिनांक 26 नोव्हेंबर 2022 शनिवारला लगेच वणी पोलीस स्टेशन गाठले व या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!