ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पंदरा दिवस होवून ट्रान्सफॉर्मर बदलण्यास टाळाळ
गहू ,चणा व मिरची सुकण्याच्या मार्गावर,शेतकऱ्यांचे तहशीलदारांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी यावर्षी अतिवृष्टी खरिप हंगाम हातून गेला असतांना आता महावितरण निष्काळजीपणामुळे खरिप हंगामही हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सालेभट्टी गावा जवळील जामणी शिवारातील गजानन आत्राम यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर जळाल्याने गेल्या १५ दिवसांपासून दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विद्यूत पुरवठा बंद झाला आहे.या सर्व शेतकऱ्यांनी उप विभागीय कार्य अभियंता झरी यांची भेट घेऊन नवीन ट्रान्सफर लावून देण्याची विनंती केली.

परंतु थकित बिल भरा तरच नवीन ट्रान्सफॉर्मर मिळेल असे अधिकारी यांचे कडून सांगण्यात आले.तडजोड करत शेतकऱ्यांनी बिलाचा भरणा केला असतांना सुद्धा दुसरा ट्रान्सफॉर्मर लावून पुरवठा सुरळीत केला नाही.त्यामुळे रब्वी हंगामातील गहु हरभरा वाळण्याच्या मार्गावर आहे.तसेच या शिवारातील शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.लाखो रुपये खर्चून पाण्याअभावी हे पिक हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

वारंवार चकरा मारून उपकार्यकारी अभियंत यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने या शेतकऱ्यांकडून तहशीलदार गिरिश जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे.तात्काळ विद्यूत पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्यावेळी गिरिधर उइके माजी समाज कल्याण सभापती बाबाराव जांबुळकर,विठ्ठल देवाळकर,अनिल देवाळकर,विलास देवाळकर,जगण मिलमिले,अरुण कुडमेथे , अविनाश कुडमेथे,नागोराव उइके,गजानन आत्राम इ.शेतकरी उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर