ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दाभाडी , वल्हार्सा गावातील पाणी टंचाई  समस्या कायम

135 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते . दाभाडी गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या  70 कुटूंब ची लोक वस्ती असलेल्या  मोठी दाभाडी  गावात एकच बोरवेल असून  काही वर्षांपूर्वी  त्यामध्ये सोलर पंप बसविण्यात  आला आहे . परंतु सोलर मध्ये बिघाड झाल्याने आता थेट विद्यूत पूरवठा करून पंप सुरु आहे .

त्यातून खूप बारीक पाण्याचा प्रवाह येत असल्याने  पाण्यासाठी महीलांना वाट पाहत बसावे लागत आहे . गावात एकच पाणी पुरवठ्याचे साधन असल्याने  पाण्यासाठी भांड्याची रांग लावून बसावे लागत आहे . विशेषतः महिलांना पिण्या करिता घरगुती वापरासाठी पाणी मुबलक मिळत नसल्याने रोजमजुरी ,कामधंदा करून  पाण्यात साठी संघर्ष करावा लागत आहे .
      
        त्याचप्रमाणे याच ग्रामपंचायत मध्ये  असलेल्या 60 घरांची  वस्ती असलेल्या वल्लार्सा या गावात सुद्धा  उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होतात . गावापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या विहारीतून पाणी काढून आणावे लागत आहे.  उन्हाळ्यात  विहीरीची पाण्याची लेवल  खाली गेली असल्याने फार कमी लोकांना पाणी मिळतात . त्यावर सोलर पंप व टाकी बसविण्यात आली आहे पण तेही बंद पडली आहे .  वृद्ध ,महिला पुरुष डोक्यावर घागर घेऊन पाणी भरतांना दिसून येते आहेत . तर काही सदन कुटूंब गावा जवळच्या शेतातून 200 रु . महिना प्रमाणे पाणी विकत घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.


        पाणी पुरवठा योजना या गावासाठी मंजूर करण्यात आली आहे. गावापासून काही अंतरावर पाणी पुरवठा करण्यासाठी 7 लाख खर्चकरून विहीर खोदण्यात आली आहे . परंतु या योजनेचे नेमके कुठे पाणी मुरत आहे हे गावकऱ्यांनाही कळले नाही.दरवर्षी पाणी टंचाई आढवा होतात ,गावकरी समस्या मांडतात , लोक प्रतिनिधी कडून  तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले जाते ,  प्रशासनाकडून  हो ला हो करून पोकळ  अश्वासन दिले जातात  . मात्र शेवटी समस्या कायम राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर