ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

यवतमाळ येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान क.महाविद्यालय मारेगाव च्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यामान यश.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

काल दिनांक 10 डिसेंबर 2022 रोज शनिवारला नेहरु क्रिडा संकुल यवतमाळ येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव ची अतुलनीय कामगिरी केली आहे.यात यश संपादन करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहे .

12 वि कला शाखेची विद्यार्थीनी कु. प्रिया मत्ते हिने गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच 11 वि कला शाखेची विद्यार्थिनी कु. वर्षा आत्राम व 11 वि वाणिज्य शाखेचा विद्यार्थी शाम ठाकरे या दोन विद्यार्थ्यांनी भाळा फेक मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्यामुळे त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांची निवड विभागीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी मारेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील आहे.

म्हणून त्याचे विशेष करून कौतुक केले जात आहे. मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु असे असून सुद्धा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम सर्व प्राध्यापकाकडून वेळोवेळी केली जात आहे.

महाविद्यालयांचे असलेलं भव्य मैदान विद्यार्थ्यांचा खेळा प्रती उत्साह द्विगुणित करते.या सर्व विद्यार्थांकडून नियमित पणे क्रीडा शिक्षकाने करून घेतलेला सराव तसेच विद्यार्थांची खेळा प्रती असलेली तळमळ,आत्मीयता या सर्व बाबींमुळे विद्यार्थांनी यश संपादन केलेलं दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या कठीण मेहनतीचे त्यांना फळ मिळालेले आहे. आज झालेल्या स्पर्धेत त्यांने प्राप्त केलेल्या यशातून निदर्शनास येते.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच प्रा. कुरेकार सर प्रा.आवारी मॅडम प्रा.मस्की मॅडम प्रा.सातपुते मॅडम प्रा.बेतवार मॅडम प्रा. चिंचोलकर सर प्रा.चोपणे सर प्रा. दानखेडे सर तसेच शिक्षेक्तर कर्मचारी निलेश बेंडे, विकास ढोके व त्यांच्या आई वडिलांना दिले आहे .

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे व प्राचार्य हेमंत चौधरी सर यांनी त्यांचे चे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर