ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रलंबीत हटवांजरी येथील शेतजमिनीचा त्वरित निकाल लावा.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अन्यथा धरणात घेणार सामूहिक जलसमाधी.

हटवांजरी येथील शेतकऱ्याचे संबंधीत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव मागील काही वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या तालुक्यातील हटवांजरी शेतजमीनीचा वाद न्यायप्रविष्ठ असून त्याचा निकाल येणाऱ्या 18 जानेवारीला लावण्यात यावा. जर निकाल 18 तारखेला लागला नाही तर प्रजासत्ताक दिनी सामूहिक जलसमाधी करू असा इशारा हटवांजरी येथील प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी अभियंता, मध्यम प्रकल्प यांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.

हटवांजरी येथे नवीन निर्मित धरण प्रकल्पामध्ये हटवांजरी येथील 11 शेतकऱ्यांची जमीन सन 2009-10 मध्ये बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली होती. या संपादित केलेल्या जमीनीला 2008 च्या भावानुसार 1 लाख 42 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे 2015 मध्ये भाव ठरविण्यात आला होता.परंतु हा जाहीर केलेला भाव अत्यल्प आणि चालू बाजार भावा पेक्षा खूपच कमी होता.

त्यामुळे ही जाहीर केलेली रक्कम या शेतकऱ्यांनी उचललेली नव्हती. या 11 शेतकऱ्यांनी नवीन भुसंपादन कायद्यानुसार मोबदला रक्कम मिळावी यासाठी कलम 64 प्रमाणे ट्रिबिनल कोर्ट,आयुक्त कार्यालय नागपूर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.दि.10 मे 2022 रोजी धरण ठिकाणी अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांचेशी चर्चा करून त्वरित निकाल लागावा यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिलेले होते.

परंतु या प्रलंबीत प्रकरणाचा निकाल लागण्यास विलंब होत असून या प्रकरणाच्या निकालाची तारीख 18 जानेवारी ही देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा दि.18 जानेवारीला निकाल लावण्यात यावा अन्यथा प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी 2023 ला हटवांजरी येथील साचलेल्या धरणाच्या पाण्यात सामूहिक जलसमाधी करू असा इशारा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

यावेळी विनोद वासाडे,दर्शना वासाडे, गणेश जुनगरी, नंदकिशोर लांडे, मोहन लांडे, ललिता उरकुडे, हेमराज कालेकर, बाबा भोयर, विलास वासाडे, वसंतराव वासाडे, पुरुषोत्तम वासाडे,

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर