ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मार्डी येथे धनगर समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार, जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि समाज प्रबोधन मेळावा संपन्न

141 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव ने केले होते आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगांव द्वारा आयोजीत वणी- मारेगांव- झरी जामणी तालूक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा,जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार त्रिमूर्ती मंगल कार्यालय मार्डी येथे सोमवार दिनांक 25 डिसेंबर,2023 रोजी उत्साहात संपन्न झाला.

मा दादाजी कालर सेवानिवृत मुख्याधापक यांचे अध्यक्षतेखाली मा.रमेश जारंडे, मा.प्रा संजय बोधे वरोरा,मा कैलासराव उराडे राजूरा, मा डॉ. प्रा. गजानन सोडनर, मा. प्रा. रमेश बुच्चे, मा. अविनाश जानकर, मा विठ्ठलराव बुच्चे,यवतमाळ मा राजेंद्र कोरडे, मा. पांडूरंग पंडिले, मा देविदास बोबडे, मा.डॉ मधुकर आस्कर वणी, मा. विठलराव काळे, मा अरविंद वखनोर, मा रविराज चंदनखेडे, मा माणिकराव पांगुळ, मा लक्ष्मण झिले, मा रामचंद्र अडते, मा मंगेश चामाटे, , निरे सर,अडते सर, चिव्हाणे सर, खुजे सर, मा. सौ सुनिता पचकटे, मा. सौ. वनिता उराडे यांचे प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला.

ज्ञान हीच संपत्ती आहे हे अधोरेखीत करून समाजाने आधुनिक तंत्रयुक्त ज्ञानाची कास धरावी असे आवाहन मा.प्रा. संजय बोधे यांनी केले.समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाबाबत व न्यायालयीन लढाई बाबत सविस्तर मार्गदर्शन मा.रमेश जारंडे, मा कैलास उराडे, मा. अविनाश जानकर यांनी केले. या सोहळ्यात ४० गुणवंत विद्यार्थी, ३० जेष्ठांचा अमृत महोत्सवी सत्कार, विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणाऱ्या २५ समाजभुषनांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याचे सुत्रसंचालन मा.प्रा.आशिष साबरे सर,प्रास्ताविक मा.रघुनाथ कांडरकर सर,अहिल्यावंदना मा.विकास चिडे सर आभार मा. राजकुमार बोबडे यांनी केले.या सामाजिक सोहळ्याला वणी मारेगांव झरी तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बंधूभगीनी उपस्थीत होत्या. या सोहळ्याचा यशस्वीतेसाठी मारेगांव-वणी-झरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वर्ण- मारेगांव -झरीजामणी तालूका, खंडोबा- वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणीच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर