ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुक्टा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मुक्टा येथे मानवतेचे महान पुजारी, विश्वशांतीचे पुरस्कर्ते व राष्ट्रधर्माचे संस्थापक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा दि. १९ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे.

श्री गुरुदेव सेवा मंडळ, मुक्टा व श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ, मुक्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा त्रिदिवसीय सोहळा हनुमान मंदिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर व जगन्नाथ महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता व ग्रामोन्नती या उद्देशाने भजन, कीर्तन, ध्यान, सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई यांसारखे विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सोमवार (दि. १९) रोजी ग्रामसफाई मोहिमेने सोहळ्याची सुरुवात झाली. सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान व पूजन, घटस्थापना तसेच सामुदायिक प्रार्थना संपन्न झाली. रात्री महिला भजन मंडळाचा भक्तिरसपूर्ण भजन कार्यक्रम झाला.

मंगळवार (दि. २०) रोजी पहाटे ध्यान व ग्रामगीता वाचन करण्यात आले. दिवसभर भजन कार्यक्रम सुरू होते. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना तर रात्री राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री गंगाधरजी लोणसावळे महाराज यांचे जाहीर कीर्तन मोठ्या भक्तिभावात पार पडले.

आज बुधवार (दि. २१) रोजी सकाळी ग्रामसफाई, ध्यान व ग्रामगीता वाचनानंतर रामधून, पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत परिसरातील विविध भजन मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी काल्याचे कीर्तन, मौन श्रद्धांजली, राष्ट्रवंदना, मान्यवरांचा सत्कार व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यास परिसरातील भाविक व ग्रामवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर