ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगांव तालुक्यातील सांवगी येथील पिडीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढवी मोबदला मिळावा

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा

या मागणी साठी प्रकल्पात जल सत्याग्रह आंदोलन केले.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव तालुक्यातील :- काल दिनांक 6 मे 2022 रोज शुक्रवारला सुमारे 23 वर्षापूर्वी पिडीत शेतकऱ्यांकडून कमी मोबदल्यात शेत जमिनी प्रकल्पाकरिता घेतल्या मात्र मोबदला अतिशय कमी दिल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जल सत्याग्रह आंदोलन केले. त्यामधे शेतकऱ्यांचा प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे.

1) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा 2) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना एकरी 20 लाख सानुग्रह अनुदान देण्यात यावे व शासकिय नौकरी मध्ये कुटूंबातील एक व्यक्तीचा समावेश करावा 3) रोजगार प्रशिक्षण व रोजगार उभारणीसाठी अनुदान देण्यात यावे. 4) जे प्रकल्पग्रस्त भूमिहीन झालेले आहे त्यांना पर्यायी शेतजमीन उपलब्ध करून देण्यात यावी 5) दिंदोडा प्रकल्प बाधित गावांतील परीवरांचा आर्थिक, व सामाजिक अभ्यास करण्यात यावा.



6) वर्धा व वेणा नदीच्या तीरावरील प्रकल्पबाधित गावाचे दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त म्हणुन पुनर्वसन करण्यात यावे 7) प्रकल्पबाधित शेतजमिनीवर ज्यांचे उदरनिर्वाह होता असे शेतमजुर यांना सुध्दा विशेष पॅकेज देण्यात यावे व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. 8) वर्धा व वेणा नदी तीरावरील प्रकल्पबाधित गावांतील मच्छीमार बांधवांसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे व प्रकल्पामध्ये मच्छीमारी करण्याकरीता त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

9) दिनांक 4/10/2018 ला 71 व्या नियामक  मंडळाच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाठबंधारे विकास महामंडळाने  अधिनियम 1997 मधील तरतुदीनुसार 34 कोटीचे सानुग्रह अनुदान प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे त्या नुसार हेक्टरी 3.10 लक्ष समंधित भूधारकांना वाटप करण्यात यावा.

या प्रमुख मागणीसाठी  प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजुर हे मोठ्या संख्येने उपस्थित होऊन वर्धा नदीच्या पात्रात सांवगी येथील पिडीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचा वाढवी मोबदला व वरील मागण्या पूर्ण कराव्या या उद्देशाने जल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. व प्रशासना कडून लवकरात लवकर या गंभीर विषयाची दखल घेण्यात यावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला नाय देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी या वेळी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर