ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बेंबळा प्रकल्प ग्रस्ताच्या न्यायिन हक्कासाठी मारेगाव येथे धरणे आंदोलन.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सर्व शेतकऱ्यानी एकत्र यावे-अविनाश लांबट अध्यक्ष सरपंच संघटना यांचे आवाहन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :- बेंबळा हक्क संघर्ष समिती, अखिल भारतीय सरपंच संघटना, व तालुका पत्रकार संघाच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालया समोर मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मार्डी, कुंभा परिसरातील अनेक गावातून बेंबळा प्रकल्पाने तयार केलेले मुख्य कालवे, उपकालवे, व पाटसऱ्या फुटून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची शासन प्रशासन स्तरावरून पाहणी करण्यात आली असताना मात्र अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही.

त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गात संतप्त भावना पसरत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच संघटना बेंबळा प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती, पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विध्यमाने मारेगाव येथील तहसील कार्यालयावर एकदिवशीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.प्रकल्प ग्रस्ताना तात्काळ मोबदला मिळावा या प्रमुख मागणी सह अतिवृष्टी, तथा पुरबुडी ग्रस्ताना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

मंगळवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 11 वाजता या एक दिवशीय आंदोलनाची सुरुवात होणार असून हे आंदोलन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, बेंबळा प्रकल्प ग्रस्त शेतकरी हक्क समितीचे अध्यक्ष सुमित जुनगरी, सचिव सुधाकर इंगोले,करणार आहे.

या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जाहीर पाठिंबा दिल्याचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम,भय्याजी कनाके यांनी घोषित केले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसानीचा मोबदला तात्काळ अदा करा या मागणीचे निवेदन तहसीदार मारेगाव यांचे कडे देण्यात येणार आहे. न्याय हक्काच्या आंदोलनात सर्व शेतकऱ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर