ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हरभरा खरेदी बंदमुळे शेतकरी संतप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाफेड तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा


आ. संजय देरकर आक्रमक, प्रशासनाला दिला इशारा


विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क वणी | प्रतिनिधी


वणी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून नाफेडमार्फत हरभरा खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रश्नावर आमदार संजय देरकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. “शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्यायचे की व्यापाऱ्यांच्या फायद्याचे राजकारण करायचे?” असा थेट सवाल करत हरभरा खरेदी तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली.

या संदर्भात आमदार देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उबाठा) च्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची गंभीर बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

आ.देरकर म्हणाले की, नाफेड खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात जावे लागत आहे. काही व्यापारी याचा गैरफायदा घेत कमी दरात हरभरा खरेदी करत असून अडत व कपातीच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघड लूट सुरू आहे. अनेक ठिकाणी ५० किलोमागे १०० रुपयांपर्यंत अवैध कपात होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


आधीच नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना हरभरा खरेदी बंद राहणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामासाठी भांडवलाची गरज असताना शेतकऱ्यांचा माल अडकून पडल्याने तालुक्यात असंतोष वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आ. देरकर यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या :
नाफेडमार्फत हरभरा खरेदी तात्काळ सुरू करावी
खासगी व्यापाऱ्यांच्या अनियमित खरेदीवर नियंत्रण ठेवावे
गोदामांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर खरेदीची चौकशी करावी
अडत व अवैध कपात तातडीने बंद करावी
शेतकऱ्यांना हमीभावाने दिलासा द्यावा
या मागण्यांवर उपविभागीय अधिकारी नितीन इंगोले यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना (उबाठा) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या बैठकीस जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, शहर प्रमुख विनोद ढुमणे, गटनेते सुधीर थेरे, महेश सोमलकर, तुलसी तेवर, राजीव पाटील, अनिकेत बतखल, शत्रुघ्न मालेकर, शंकर देरकर, सचिन पाटील, राजू गोलाईत, साबीर भाई आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर