ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा

333 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रक्तदान शिबिर,महिला उद्योजक्ता शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना बि-बियाणे किटचे वाटप

तालुका प्रतिनिधी वणी

वणी : शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात हा अभिष्टचिंतन  सोहळा पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 80 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर महिला उद्योजक्ता शिबिरात मोठ्या संख्येने बचत गट, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिला सहभागी झाल्या होत्या.


दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते बी-बियाणे कीटचे वाटप करण्यात आले.अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष विश्वास नांदेकर होते तर उद्घाटक विजय मुकेवार होते.  एपीआय सीता वाघमारे, नरेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेच महिला उद्योजक शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात नाबार्डचे अतुल इंगळे, जयंत सोनटक्के व गणेश आत्राम यांनी महिलांना बचत गटासाठी असलेले विविध लघूउद्योग, कर्जवाटप इत्यादींची माहिती दिली.

या कार्यक्रमानंतर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना बी-बियाणे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. यासह ग्रामीण रुग्णालयात फळवाटप वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी लाईफलाईन नागपूरच्या टीमने सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर