ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

‘साजोनी पुजन’ करून नविन शेती हंगामाचा शुभ मुहर्त.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- भारत हा कृषी प्रधान देश असून आधुनिक काळात सुधा त्याच पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात.ग्रामीण भागात गुढी पाडव्या पासून नवीन वर्षाची सुरुवात करतात.आज गावोगावी घराला आंब्याच्या पानाचे तोरणे व गुढी उभारून मराठी नववर्षाच स्वागत करण्यात आले.

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवसाला फार महत्व आहे. शेतकऱ्यांना हा दिवस महत्वाचा असून या दिवसापासून शेतीचा नवीन हंगामची सुरूवात होते.भाड्याने किंवा भागीदारीने शेत करणारे या दिवसा पासून ग्राह्य धरतात.भाऊबंदकीची शेतीची हिस्से वाटणी या दिवसा पासून ग्राह्य धरण्यात येते.नवीन सालगडी या दिवसा पासून कामावर रुजू होतात.

आधुनिक काळात नवनवीन शेतीची अवजारे आली असली तरी बैल जोडी आणि पारंपारिक अवजारे यांना आजही महत्व आहे.याच अवजाराने जमीन कसली जाते.त्याच प्रमाणे शेतात राबणारा माणूस खूप महत्वाचा आहे.शेतात बारा महिने राबणाऱ्या सालगड्या च्या किंमती दिवसेंदिवस वाढ होत असून कमीत कमी १ लाख २० हजार काही गावात १ लाख ५० हजार रुपये एका वर्षांला मोजावे लागते.

चांगल्या व विश्वासु गड्यासाठी मालक इतरांपेक्षा जास्त किंमत द्यायला तयार असतो.ग्रामीण भागासह मोठ्या गावात चांगल्या गड्यासाठी चढाओढ सुरू असते.गुढीपाडव्यापासून नवीन गडी कामाला तोरण बांधून पुजा करून कामाला सुरुवात करतात.याच दिवशी साजोनी पुजन करून नविन हंगामाची सुरुवात होते, साजोनी साठी नवीन वखर,जुपणं’ लोखंडी फास नविन साहित्य शक्यतोवर लावली जाते.

जे शेतकरी स्वतः शेतात राबतात स्वतः साजोनी पूजन करतात.मोठे शेतकरी गड्याच्या हाताने साजोनी पुजा करतात.या निमिताने बैल धूवून साजसजोटो वखर जुंपून सकाळी शेतात नेतात. शेतात पूजन करून वखर शेतात व गावातील मंदिरात भोवती फिरविला जाते.त्यानंतर घरी आणून गृहलक्ष्मीच्या हस्ते बैलाचे पूजन केले जाते.

यावेळी स्थानदेवता आणि ग्रामदेवतांची ही पुजन करून साजोनी पुजन संपन्न होते.साजोनी पुजा केल्याशिवाय शेतातील मशागतीच्या कामाला सुरुवात केली जात नाही.काही गावाला ‘जुन्या सालात ‘ म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तर काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवसी पाच धान्य एकत्र करून शिजवण्यात येते त्याला ग्रामीण भागात ‘घुगरी’ असे म्हणतात.

या दिवशी घुगरी खाण्याची पध्दत आहे .कुटुंबातील भाऊबंदकीची लोक तसेच बलुतेदार, मिञ मंडळी यांना सोबत घेवून गोडधोड जेवण करण्याची प्रथा आजही काही गावात रूढ आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर