ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मारेगाव येथे रस्ता रोको आंदोलन.

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बस स्थानकाच्या मागणीसाठी दोन तास चक्काजाम.

गजानन आसुटकर मारेगाव :-येथे आज दिनांक 21 मार्च 2023 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली होती.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर मारेगाव शहरात सुमारे दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.असुन या मोर्चाने रौद्ररूप धारण केल्याने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना लगेच मारेगाव येथे मोर्चा स्थळी दाखल व्हावे लागले होते.

मारेगांव येथील बस स्थानका अभावी महिलांची व प्रवाशांची होत असलेली कुचंबणा थांबावी व मारेगाव येथे लवकरात लवकर बस स्थानकाचे काम करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.

मारेगांव हे तालुक्याचे ठिकाण असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून मारेगाव येथील बस स्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष बसस्थानकाच्या मागणी संदर्भात आक्रमक झाल्याचे चित्र आज दिसून आले.आज दिनांक 21मार्च 2023 रोज मंगळवारला बस स्थानकाच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सुमारे दोन तास वाहतूक अडवून प्रशासनाचे लक्ष केंद्रीत केले.

हे प्रकरण आटोक्याच्या बाहेर जात असल्याचे लक्षात येताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना थेट मारेगाव येथे मोर्चा स्थळी येऊन मध्यस्थी करावी लागली.चक्काजामच्या ठिकाणी पोलिसांचा मोठया प्रमाणात बंदोबस्त होता.यावेळी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी,तहसीलदार दीपक पुंडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.तर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात चक्काजाम स्थळी दाखल झाली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर