ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव ट्रकची कारला भीषण धडक दोन ठार.

212 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वरोरा जवळील घटना वणी येथील दोन्ही डॉक्टर पती-पत्नी ठार.

तालुका प्रतिनीधी:- वणी.

In the incident near Varora, both doctor husband and wife from Vani were killed.

चंद्रपूर येथून गुढीपाडवा सण साजरा करून वणी कडे परत येत असलेल्या डॉक्टरचा कारला वरोरा शहरापासुन जवळच भरधाव ट्रकने कारला समोरासमोर जबर धडक दिली.या भीषण अपघातात वणी येथील महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचे डॉ.पती गंभीर जखमी झाले होते त्यांना वरोरा येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते.पण उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.ही घटना आज दिनांक 22 मार्च 2023 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घटना घडली आहे.

डॉ.अश्विनी गौरकार (झाडे) वय सुमारे 31 वर्ष असे मृतक महिला डॉक्टर चे नाव आहे.त्या मारेगाव शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर होत्या आणि वणी येथील रहिवासी होते.त्यांचे पती डॉ.अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले होते. हे पती-पत्नी आज चंद्रपूर कडून वणी कडे MH.34.AM.4240 ह्या नंबरच्या कार ने वरोऱ्या कडून वणीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक ने समोरासमोर जबर धडक दिली.

अपघात होताच रस्त्यांनी ये- जा करणाऱ्या व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.व लगेच घटनेचे माहिती पोलिसांना देण्यात आली.व जखमींला तातडीने उपचारासाठी वरोरा येथील दवाखान्यात हलविण्यात आले पण उपचारादरम्यान डॉक्टर अतुल गौरकार यांच्या पण मृत्यु झाला आहे.

या घडलेल्या दुर्देवी घटनेने वणी- मारेगांव परीसरात व वैद्यकीय क्षेत्रात पूर्ण शोककळा पसरली आहे.तरुण डॉक्टर पती-पत्नी दाम्पत्य अचानक अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांचे चिमुकले बाळ पोरके झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर