ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

महाराष्ट्रात जिहाद कराल तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालणारच:जलील यांची जागा जेलमध्येच- राणे, अवैध धंदे करणाऱ्यांची गय नाही- केनेकर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जर कुणी जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला, तर ‘देवाभाऊंचा’ बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी सकाळी महापालिकेने एआयएमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवल्यानंतर राणे यांनी हे विधान केले आहे. राज्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे.छत्रपती संभाजीनगर मनपाने अखेर घाण साफ करायला सुरूवात केली आहे. मतीन पटेल यांच्यावर कारवाई झाली ही तर सुरूवात, असे म्हणत भाजपचे नेते संजय केनेकर यांनी मतीन पटेलांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करत राज्यात अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई होणारच असे म्हटले आहे. निदाला संभाजीनगरातून झाली अटक 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी निदा खानला अटक करण्यात आली होती. पोलिस तपासानुसार, मतीन पटेल यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने 9 मे रोजी पटेल यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावत 72 तासांत उत्तर मागितले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुधवारी सकाळी प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात पटेल यांचे घर आणि कार्यालय जमीनदोस्त केले. इम्तियाज जलीलांची जागा जेलमध्ये नाशिक जिहाद प्रकरणावर बोलताना राणे यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली. नाशिक प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड जलील आहे. जे लोक ‘महाराष्ट्र को हरा कर देंगे’ अशा वल्गना करतात, त्यांची जागा बाहेर नाही तर जेलमध्ये आहे. लवकरच या प्रकरणाचा नारळ फुटेल, असा दावाही त्यांनी केला. ठाकरे अन् अर्थतज्ज्ञ यांचा संबंध काय? राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, ठाकरे आणि अर्थतज्ज्ञ यांचा नेमका संबंध काय? अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेची खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदींचे आवाहन देशासाठी नीतेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही भाजपचे नेते म्हणून आवाहन केले नाही. त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आाहन केले आहे. त्यामध्ये पक्षीय राजकारण कुणी आणू नये. देशासमोर उद्या जे संकटे येऊ शकतात त्या संदर्भात हे आवाहन केले होते. त्यावर जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुमच्या भारतीय असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. मतीन हा माझा विश्वासू माणूस- जलील मतीन पटेल यांच्याविषयी बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मतीन हा माझा विश्वासू माणूस आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे, असे ते म्हणाले. घाण साफ करायला सुरूवात- केनेकर छत्रपती संभाजीनगर मनपाने अखेर घाण साफ करायला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कायद्याचे राज्य आहे. जनमानसांमध्ये या कारवाईमुळे एक विश्वास निर्माण झाला आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. राज्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर कारवाई झाली ही तर सुरूवात आहे. कायदा सोडून वागेल त्याला असेच कायद्याने उत्तर मिळणार आहे, असे भाजपचे नेते संजय केनेकर यांनी म्हटले आहे. अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई होणारच संजय केणेकर म्हणाले की, एमआयएम देशामध्ये अराजकता माजवू पाहते त्यांना दिलेला हा पहिला चोप आहे. जलील यांनी बंगला बांधून द्यावे नाही तर काहीही द्यावे पण अवैध काम करणाऱ्यावर सरकार कारवाई करणारच.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर