ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

परदेश दौरे रद्द करा, ताफ्यातील गाड्या कमी करा:पीएम मोदींच्या आवाहनानंतर CM फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन टंचाईच्या आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगामी सर्व परदेश दौरे तातडीने रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, ज्या दौऱ्यांची पूर्वतयारी झाली आहे किंवा ज्यांना मंजुरी मिळाली आहे, असे दौरेही आता रद्द करावे लागणार आहेत. विविध सरकारी कामांसाठी किंवा अभ्यासाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संख्येवर यामुळे मोठा परिणाम होणार आहे. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या आवाहानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय परदेश प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या घटणार केवळ परदेश दौरेच नाही, तर राज्यातील मंत्र्यांच्या लवाजम्यावरही आता मर्यादा येणार आहे. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात गाड्यांची मोठी रांग असते, ज्यामुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता मंत्र्यांच्या ताफ्याचा आढावा घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात गरजेपेक्षा जास्त वाहने आहेत, ती तातडीने कमी केली जाणार आहेत. विशेषतः मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आता कमी दिसणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे कल आणि इंधन बचत पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रशासकीय वर्तुळात इंधन बचतीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक मंत्र्यांनी स्वतःहून पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. डिझेल-पेट्रोलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवासाला प्राधान्य देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदींचे आवाहन काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनामध्ये केवळ इंधनच नाही, तर इतर अनेक गोष्टींमध्ये काटकसर करण्याचे सांगितले होते. यामध्ये सोन्याची खरेदी टाळणे, खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे आणि जास्तीत जास्त ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देणे अशा मुद्यांचा समावेश आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा अवलंब करून स्वदेशी उत्पादने वापरण्यावरही त्यांनी भर दिला आहे. याच आवाहनाचा आधार घेत राज्य सरकारने आता प्रशासकीय शिस्त आणि काटकसरीचा नवा पायंडा पाडला आहे. हे ही वाचा… एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा (EV) वापर सुरू केला असून इतर मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर