ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

पटेल, तटकरेंसह 22 आमदार भाजपतून लढणार:रोहित पवार यांचा दावा; तटकरेंना ‘सिल्व्हर ओक’चा चहा आवडत असल्याचाही टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपतून लढणार असल्याचा दावा विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून, या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुनील तटकरे व सुनील शेळके यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच सुनेत्रा पवारांनी या प्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावरही निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवारांची कारवाई योग्यच होती, पण… रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सुनेत्रा पवारांनी केलेली कारवाई स्वगात करण्यासारखीच होती. तो एक धाडसी निर्णय होता. धाडसी निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळे ट्विट करून हो, नाही करणे करणे हा त्या पक्षाचा विषय असला तरी अवघड आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला असता तर त्यांनी तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता तर आम्हीही आपला निर्णय बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलण्यातून त्या पक्षात अनेक नेते असल्याचा संदेश जातो. यासह पद काय दिले काय दिले नाही हे वैयक्तिक पातळीवर संबंधितांना काय वाटते हा त्यांचा मुद्दा आहे. तो त्यांना लखलाभ. पटेल, तटकरेंसह 22 जण भाजपतून लढणार रोहित पवार यांनी यावेळी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचेही काही आमदार भाजपच्या गळाला लागलेत. मावळचे आमदार (सुनील शेळके) हे सुद्धा भाजपमधूनच लढणार आहेत. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याविषयी मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. ते भाजपमधूनच लढणार आहेत. फक्त प्रक्रिया फास्ट झाली. पत्रकारांनी यावेळी त्यांनी सुनील तटकरे व शरद पवारांच्या भेटीविषयी प्रश्न केला असता त्यांनी त्यावर अत्यंत मिश्किल टिप्पणी केली. सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, असे ते म्हणाले. भाजपसोबत जे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही, पण भाजपची साथ सोडून कुणी आमच्याकडे आले, तर आम्ही त्यांना स्वीकारु, असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले. सुनील तटकरे, शेळकेंनी टोलवला विषय दुसरीकडे, सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या दाव्यावर भाष्य करताना आपण त्यांच्या मताला कोणतीही किंमत देत नसल्याचे ठणकावून सांगितले. मी रोहित पवार यांच्या मताला कोणतीही किंमत नाही, असे ते म्हणाले. सुनील शेळकेंनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. गत काही महिन्यांपासून रोहित पवार सातत्याने खोटे बोलत आहेत. सवंग प्रसिद्धीसाठी ते खोटे बोलून जनतेला फसवत आहेत. बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता. ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावे का? रोहित पवारच 2029 मध्ये काँग्रेसकडून बारामतीत उभे राहण्याचा प्लॅन करत आहेत. हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही ते बोलून दाखवत नाही. त्यांनी पक्षात कितीही चलबिचल करण्याचा प्रयत्न केला, तर काही फरक पडणार नाही, असे शेळके म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर