Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मारेगाव तहसीलदार यांना काँग्रेसचे निवेदन.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल नोंदवला निषेध.

गजानन आसुटकर मारेगाव:-काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देत निषेध नोंदवला. तसेच धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले.

नुकतेच राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावली. ही सजा होताच लोकसभा सचिवालयाने यावर तात्काळ कार्यवाही करीत त्यांची खासदारकीही रद्द केली. ही कार्यवाही एवढ्या घाईत करण्यात येऊन राहुल गांधी यांच्यावर आकस उगवला. या कार्यवाहीविरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशभर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केल्या जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव तालुका काँग्रेस पक्षातर्फे दि.27 मार्चला दुपारच्या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे देत निषेध नोंदवला.भारतीय जनता पार्टी व मोदी सरकार ही दडपशाही मार्गाने विरोधी पक्षाचे दमन करीत आहे. हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा अपमान आहे.

व केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे सरकार हे मनमानीपणे कारभार करीत आहे.त्यामुळे देश हा हुकूमशाहीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला.राहुल गांधी यांची शिक्षा व निलंबन रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहील असेही काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, म.सह. बँकेचे जिल्हा अध्यक्ष टिकाराम कोंगरे,आशिष खुलसंगे,नरेंद्र पा. ठाकरे,अरुणाताई खंडाळकर,वसंतराव आसूटकर,गौरीशंकर खुराणा,मारोती गौरकार,धनंजय आसूटकर,प्रफुल विखणकर, रविराज चंदनखेडे,रवी धानोरकर,नानाजी डाखरे,गणूजी थेरे, अशोक धोबे,जगन ठाकरे,अरविंद वखनोर,रवी पोटे,विनोद आत्राम,रमण डोये,माणिक पांगुळ,गंगाधर ठावरी,अंकुश माफूर, देविदास बोबडे,यादवराव काळे,यादवराव पांडे,विलास वासाडे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!