ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव शहरात चोरीचे सत्र..एकाच रात्री दोन घरी चोरी.

115 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला.

गजानन आसुटकर मारेगाव :-शहरातील वार्ड क्रमांक 5 (ओम नगरी) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून एका घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना सोमवार ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मारेगाव येथील ओम नगरीत वास्तव्यास असलेल्या अनिल डाखरे हे राहतात. दि.27 मार्चचे पहाटेच्या सुमारास त्यांचे घराचा समोरील दरवाजा बाहेरून लावला.आणि मागील दाराचे कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.घरातली सदस्य झोपेत असतांना चोरट्यांनी संधी साधुन त्या रूम मध्ये महिला पाहुणी झोपलेली होती. हे सर्व गाढ झोपेत असतांना चोरट्यांनी आत प्रवेश केला.

आणि बाजुला रूम मध्ये ठेवलेली पेटी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.त्या पेटीत असलेले किमान 30 हजार रुपये रोख,सोन्याची एकदानी व कानातील डुल असे 25 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.तसेच या चोरट्यांनी घर शेजारी असलेल्या लोहे यांचे घरी भाड्याने असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर राऊत यांचे खोलीचा ताला फोडून आत गेले.

मात्र खोलीत कागदपत्रांशिवाय काहीच त्या चोरट्यांचा हाती लागले नाही.भर वस्तीत हा चोरीचा प्रसंग घडल्याने मारेगावकरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी अपेक्षा मारेगावकर व्यक्त करीत आहेत.अज्ञात चोरट्यांन वर कलम 457,380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जामदार आनंद अलचेवार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर