ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्याने चिंचाळा येथील बैलजोडी ठार.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथील घटना.

गजानन आसुटकर मारेगाव,

नाल्यातील पाण्यातून बैलबंडी घरी नेत असतांना त्या पाण्यात असलेल्या जीवंत कृषि पंप एल टी लाईनच्या विजेच्या धक्याने बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना तालुक्यातील चिंचाळा येथे आज दिनांक 14 मे 2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथे गावाला लागूनच नावडे यांच्या शेता जवळ जिवंत नाला आहे.येथील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जायला या नाल्याला ओलांडून जावे लागते.नेहमीप्रमाणे चारुदत्त दातारकर यांची बैलजोडी रामकिसन खंडरे यांनी आपल्या शेतातील कामासाठी शेतामध्ये नेली होती.

ते शेतातील काम आटोपून बैलबंडी दातारकर यांच्या शेतामध्ये नेत असतांना मध्ये असलेला नाला ओलांडत असतांना या नाल्यामध्ये जीवंत कृषि पंप एल टी लाईनच्या विद्युत तार नाल्यातील पाण्यात पडून होता.पडलेल्या ताराविषयीं कोणालाही माहिती नव्हती.यांची बैलबंडी पाण्यात जाताच बैलाला विद्युत तारेचा जोरदार झटका बसला.सुदैवाने खंडरे यांच्या पायातील चपलेने त्यांना वाचवले.

विजेचा झटका बसताच त्यांना बाजूला फेकून दिले त्यामुळे खंडरे यांचा जीव वाचला.परंतु बैलांना वाचवण्यात अपयश आले.शेतीचा हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून दोन्ही बैलांच्या अशा मृत्यूने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेती कशी करावयाची.हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी पिडित शेतकऱ्याची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर