ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कुंभा येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रपुर येथे उपचारादरम्यान मृत्यू.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका 44 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

साविस्तर वृत्त असे की..
कैलास नानाजी खोके वय सुमारे 44 वर्ष रा. कुंभा असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याचे नाव असून कैलास हा दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला नेहमी प्रमाणे शेतातील कामासाठी गेला होता. दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी मोनोशिल नावाचे विषारी कीटनाशक प्राशन केल्याचे शेतात असलेल्या कुटुंबातील काही व्यक्तिच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली.

आजू बाजुच्या शेतातील शेतकऱ्यानी त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.पण उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे नावाने येथे 9 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या वर्षीचा अतिवृष्टी मुळे झाल्येल्या नुकसानी मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मृतक शेतकरी कैलास याच्या पश्चात पत्नी, असा आप्त परिवार आहे.या घटनेने कुंभा गावात शोकाकुळ पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर