ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गोवंश तस्करांना रोहपट येथे रंगे हाथ पकडले.

135 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कत्तलीसाठी तेलंगणात नेणाऱ्यावर एल.सि.बी.पथकाची धडाकेबाज कारवाई.

9लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपीना अटक

सुरेश पाचभाई /मारेगाव.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रोहपट रोडवरील एका दवाखान्या पासून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफास करण्यात आला असून घटना स्थळा वरून 9 लाख रुपये किमतीचे 45 नग गोवंशाची सुटका करून आरोपीना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाला यश आले आहे.

तसेच गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या 5 हजार रुपये सॅमसंग कपंनीचा मोबाईल असा एकूण 9 लाख 5 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तस्लिम खॉ वहाब खॉ कुरेशी ,मुकुंदा जाधव,सुनील गुंजेकार,शंकर भोजेवार,उमेश चाफले रा.सर्व मारेगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नावे आहेत.

ही पाच संशयित 45 नग बैल जातींचे जनावरे रोहपट ते करणवाडी रोडवरून तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना देण्यात आली होती.या माहितीच्या आधाराने सापळा तयार करण्यात येऊन ही धडक कारवाई करण्यात आली. या संशयिता कडून तीन तीनच्या कळपाने घेऊन जात असलेल्या 9 लाख रुपये किमतीच्या 45 जनावराना घटना स्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेण्यात आली.ही जनावरे कोणाची व कोठून आणली याबाबत विचारपूस करण्यात आली असताना त्यांनी पहिल्यांदा उडवा उडवीची उत्तरे दिली.
मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही जनावरे दिग्रस मार्गे तेलंगना राज्यात कत्तलीसाठी विक्री करिता नेणार असल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई काल दिनांक 30 मेच्या सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास रोहपट ते करणवाडी रोडवर करण्यात आली आहे.त्याच्या कडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सॅमसंग कपंनीचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल,बांबूची काठी तथा 9 लाख किमतीचे जनावरे असे एकूण 9 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तस्कराच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुरुगणेश गोशाळा येथे रवाना करण्यात आले असून पशुवैधकीय तपासणीचे पत्र देवून त्यांची शारीरिक चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. संशयितावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सहकलम 119, जनावराना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीसाठी विक्रीकरिता पायदल भर उन्हात निर्दयी पणे व क्रूरपने जनावरे घेऊन जाणे कलम 11(1)(क )(घ )(च )1960सहकलम 5 अन्वये गुन्हे कायम करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षा पासून मारेगाव तालुका गोवंश तस्करीचे केंद्र बिंदू ठरले आहे.शहरातून लाखो रुपये किमतीच्या गोवंगेल्या अनेक दिवसा पासून जणांवराची निर्दयी तथा क्रूरपणे तस्करी होत असताना यवतमाळ शाखेच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे.

या यशस्वी पथकामध्ये जिल्हा गुन्हे अन्वेशन विभागाचे हेडकांष्टेबल सुनील प्रल्हादराव खंडागळे, यांनी वरिष्टाच्या मार्गदर्शना खाली मारेगाव पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. फिर्यादची दखल घेत मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस हेडकाष्टेबल चांदेकर तथा सुंकूरवार,तथा त्यांची चमू करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर