ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षेचे इतिवृत्त

902 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षेचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले होते.

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.इयत्ता चौथी व इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.   या परीक्षेत जे पहिले तीन विद्यार्थी येईल त्यांच्यासाठी रोख रक्कम स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी वरुड केंद्रातील 73 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  त्यापैकी 69 विद्यार्थी परीक्षेला हजरत होते. या परीक्षेसाठी गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गोपीचंद महादेव वाढई,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सपनाताई कीनाके, तसेच श्री.प्रमोद जी बावणे,  श्री.संतोष सिडाम, श्री.रितेशभाऊ काटकर, श्री.राजकुमार भरणे श्री. सुरेंद्र निखाडे आकापुर गावच्या उपसरपंताई मंजुषाताई काटकर ,शिल्पाताई निखाडे, संजीवनीताई भरणे, कुळमेथे ताई, सुनिताताई भासपाले ,अंगणवाडी सेविका आत्रामताई तसेच संध्याताई निखाडे,ग्रामपंचायत सदस्य हरीशभाऊ परचाके तसेच युवा सुमित पिंपळकर हे हजर होते.महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषाताई सिडाम उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.शाळा व्यवस्थापन समितीने सर्व शिक्षकांसाठी व विद्यार्थासाठी उत्तम जेवणाची व्यवस्था केलेली होती.केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षे साठी माननीय माझी केंद्रप्रमुख श्री.बाबारावजी ढवस सर,विद्यमान केंद्रप्रमुख श्री.निलेश आत्राम सर तसेच श्री.अमर देवाळकर सर ,माननीय श्री.गजानन पाटील सर, श्री.महेंद्र कठाने सर श्री.संतोष लोखंडे सर तसेच श्री.विनोद ढोणे सर तसेच सौ.कुसुमताई मदनकर मॅडम , सौ.जयश्रीताई मानकर मॅडम, सौ.अरूनाताई बंडे मॅडम , सौ.सपनाताई जीवतोडे मॅडम यांच्या उपस्थितीत केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.

केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षा संपल्या नंतर सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी ,पालक मंडळींनी जेवनाचा आस्वाद घेतला आणि सर्व विद्यार्थी  परतीच्या प्रवासाला लागले, अशा प्रकारे जिल्हा परीषद  प्राथमिक शाळा आकापूर येथे केंद्रस्तरीय नवोदय पूर्व परीक्षा पार पडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर