ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

बकरी ईदपूर्वी मारेगावात पोलिसांचा दमदार रूट

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मार्चशांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : बकरी ईद सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मारेगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी शहरात रूट मार्च काढून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला.मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली.

मार्चपूर्वी पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांना आवश्यक सूचना देत सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या.या मोहिमेत सुमारे २० पोलीस कर्मचारी आणि १७ होमगार्ड सहभागी झाले होते. रूट मार्चची सुरुवात मारेगाव पोलीस स्टेशन येथून करण्यात आली. त्यानंतर बसस्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोशिया मस्जिद परिसर, बाळासाहेब ठाकरे चौक, नगरपंचायत मार्ग, मार्डी चौक आदी प्रमुख भागातून मार्च काढण्यात आला.

सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अफवांवर नियंत्रण राहावे तसेच नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसून आले.रूट मार्चदरम्यान शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर